Saturday, February 13, 2010

पुण्यातला स्फोट आणि निर्लज्ज महाराष्ट्र टाईम्स

काल आपल्या पुण्यामधे स्फोट झाला आणि सरकारची अकार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली. तरी बरेच दिवसांपासुन चुकचुकल्यासारखं वाटत होतं की सगळं कसं काय ठीक चालु आहे बरं? चिदंबरम एवढे कार्यक्षम आहेत का? पण नाही. बरं झालं या सरकारने आपल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आपलं पण नशीब खोटं. सरकार काय किंवा विरोधक काय, सगळेच चोर मग कशाला कोणाला मत द्यायचं? खानाच्या पिक्चर साठी सगळे पोलिस लावलेत कामाला आणि घ्या इकडे पुण्यात स्फोट. काय चिदंबरम, तुमच्यात आणि त्या शिवराज पाटील चाकुरकरांमधे काय फरक आहे हो? त्या चाकुरकरांना अकार्यक्षम म्हणुन घरी बसवलं मग तुमचं गुप्तचर खातं काय झक मारतंय का? स्फोट तर होणारच हो मग त्यांचा उपयोग काय आहे? या गुप्तचर खात्यांच्या लोकांना घरी बसवा किमान आमच्या टॆक्सचा पैसा तरी वाचेल. या आता नेहमीसारखं पुढे आणि सांगा, "तपास चालु आहे. आरोपींना शिक्षा देऊ". आम्हाला सवय आहे हो असले टिपिकल वाक्य ऐकण्याची. कोणत्याही राजकीय नेत्याच्या आणि फिल्मस्टारच्या घरचे लोक नाही मरत स्फोटामधे, आम्ही मरतो. मुंबई मधे जेव्हा लोकल ट्रेनमधे स्फोट झाले तेव्हा बांद्र्याच्या ट्रेन मधे माझ्या बाजुच्या डब्यात स्फोट झाला होता आणि मी दरवाज्याशी उभा होतो. माझ्या दहा फुटांवरती मृत्यु होता. ट्रेन थांबली आणि खाली उतरुन बघितलं, सगळा डबा उडुन गेला होता. नोकरीवरुन घरी जाणारे मध्यमवर्गीय लोक होते सगळे. सगळ्यात आधी एका बाईंच शव दिसलं, साडीवरून त्या चांगल्या नोकरीमधे असाव्यात असं वाटत होतं. त्या कोण होत्या हे कळायला मार्ग नव्हता कारण फक्त धड शिल्लक राहीलं होतं. मला स्फोट झालाय हे ऐकल्यावर अजुनही तेच चित्र आठवतं. बांद्रा स्टेशन आणि सगळ्या रुळांवरती रक्त. चिदंबरम, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार, समस्त ठाकरे, शाहरुख खान, तुमच्या कोणाच्याही घरचं कोणी मेलं का मागच्या काही स्फोटांमधे? सांगा. राहुल गांधीचं नाव घेत नाहीये कारण त्याने आजी आणि वडिलांना गमावलंय. मागच्या काही दिवसात नको नको त्या फालतु विषयांवर चर्चा करुन नुसता ऊत आणलाय तुम्ही लोकांनी. आता बोलाच तुम्ही सगळे.

तो कसाई कसाब हसत असेल तुरुंगात बसुन. अजुन त्याच्यावरच खर्च करताय आणि त्याच्या भाईबंदांनी ईथे अजुन एक नरसंहार केला. मागच्या वर्षात कसाब वर एक कोटीच्या वर खर्च झाला म्हणे. आता बोला. का खर्च केला एवढा? इतके पुरावे असताना एवढा वेळ लागतो का एका केस साठी? त्याच सीएसटी वर नेऊन त्या कसाबला जाहीर फाशी का नाही दिली अजुन? सांगा. आणि त्यात कळस म्हणजे अतिरेकी हल्ले, महागाई, तुमचं राजकारण, वेगळा विदर्भ, शेतकर्यांच्या आत्महत्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढं सगळं असताना पण निर्लज्ज महाराष्ट्र टाईम्स ने सरकारने १०० दिवस यशस्वीरित्या पुर्ण केले आहेत अशी बातमी दिली आहे आणि सरकारचा प्रचंड कौतुक केलं आहे. या बातमीची तारीख बघा. १४-फेब्रुवारी-सकाळी ६.३३, म्हणजे पुण्यातल्या स्फोटाच्या दुसर्या दिवशी. लाज कशी वाटत नाही मटाच्या लोकांना. तुम्ही ही बातमी वाचाच.

हॅप्पी १०० डेज!...सरकारची सेंच्युरी असं नाव दिलंय या बातमीला या नालायकांनी.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5570871.cms
मी काल परवाच एक विधान केलं की मटा चांगला पेपर वाटतो. पैसे घेऊन बातम्या छापणारे लोक वाटत नाहीत हे. कान धरुन माफी मागतो या असल्या लोकांवर विश्वास ठेवला म्हणुन. मी या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे पण मटा छापेल असं वाटत नाही. ईथे ती प्रतिक्रिया देत आहे. थांबवतो, यापेक्षा जास्ती काय बोलावं काही कळत नाहीये. बधीर अवस्था झालेली आहे.

"मटा वाल्यांनो, या असल्या भिकारड्या बातम्या छापण्यासाठी कॊंग्रेस सरकारने किती पैसे खाऊ घातले तुम्हाला ते सांगा आधी. पुण्यात बॊंबस्फोट झालाय आणि तुम्ही सरकारने १०० दिवस पुर्ण केले म्हणुन अभिनंदन करताय? हद्द आहे. धान्यापासुन दारु बनवण्यासाठी अनुदान देणारे, शाहरुख खानचा पिक्चर रिलीज व्हावा म्हणुन पोलिस दलाला कामाला लावणारे, पिण्याच्या पाण्यासाठी काहीही भरीव योजना न करणारे, शेतकर्याच्या आत्महत्या रोखु न शकणारे आणि तुमच्या सारख्या लोकांना पैसे देऊन स्वत:च कौतुक करुन घेणारे सरकार. मागच्या १० वर्षापासुन मटाचा नियमित वाचक आहे. पण आजची तुमची पापं बघुन सांगतो, इथुन पुढे तुमचा पेपर वाचणं बंद आणि लोकांना पण हे सांगणार आहे. हिंमत असेल तर माझी प्रतिक्रिया छापुन दाखवा राष्ट्रदोह्यांनो.
सौरभ पंची"

11 comments:

हेरंब February 13, 2010 at 9:59 PM  

छान लेख.. प्रतिक्रिया विशेष आवडली. मि पण मटा चा सच्चा वाचक आणि भक्त. पण ते असले तारे तोडायला लागलेत हे बघून आता १० वेळा विचार करायला लागेल मटावर क्लिक करायच्या आधी.

Saurabh Panchi February 13, 2010 at 10:10 PM  

हेरंब,
अहो मला पण धक्काच बसतोय मटाचे हे धंदे बघुन. कोणत्या पेपरवर आणि कोणत्या पक्षावर विश्वास ठेवावा हेच कळत नाहीये आता तर.

Anonymous February 13, 2010 at 11:48 PM  

मस्तच लिहिलय.
मी मटा वाचण बरेच वर्षे झालेत बंद केलय. सर्वांनी एकत्रच बहिष्कार टाकण्या लायक पेपर आहे हा.
माझे मत आहे कि त्यात कॉंग्रेस विकतच्या बातम्या लावत नाही तर अख्खा पेपरच विकत घेतलाय.

Anonymous February 14, 2010 at 12:25 AM  

mata ha tar fakta uthal washakaamsathi aahe .ma tyana sampadakiya mulya na newsvlurbadal aastha,, samajat naahi ka lok waachun traas karoon ghetat?

sharayu February 14, 2010 at 3:35 AM  

I want to know if a movement can be started through blogs to impress upon people that Govt. is not willing to protect you.

Kapil Deo February 14, 2010 at 3:58 AM  

U must know saurabh, the same news has been published in Lokmat. And don't know may be in other papers too.According to me the major culprit in todays society is Media. In every single time. In fact this MNIK issue was ignited by media only. But I feel whatever is there all is ours. The system is made up of people only, no matter how better system you opt. It won't be affective unless every single person of this country changes. Anyways I have already written a post on this on my blog in past.
Anyways can understand your reaction.
Kapil

nivedita February 14, 2010 at 12:34 PM  

khup ch chan saurabh tu lihalela 1 na 1 wakya barobar ahe . khup awadala tuza blog amhi sagalyani milun to wachala office madhe. tyanchya sagalyan kadunhi shubhecha ani chan lihitos asach lihit raha

Anonymous February 14, 2010 at 12:50 PM  

कहीही वाचल तरी त्यातल, योग्य, अयोग्य, खर, खोट याची पारख करण स्वत:लाच जमवुन घ्यायला लागनार आहे.

Saurabh Panchi February 14, 2010 at 2:45 PM  

निवेदिता,
प्रतिक्रियेसाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद आणि ब्लॊग वर स्वागत.

Anonymous,
पेपर मधे लिहिलेलं अयोग्य आणि खोटं असु शकतं तर कशाला वाचायचा पेपर? पत्रकारिता याला म्हणतात का? विश्वासाचं दुसरं नाव होतं पेपर म्हणजे.जाऊ दे काय बोलणार? इथुन पुढे हा पेपर न वाचलेला बरा.

Swapnil P. Bendekar February 15, 2010 at 12:33 AM  

Apratim lekh....
ya bejababdar media chya virudh awaj uthwaylach hawa. Anyatha the nako aslelya goshtina awajwi mahatw deun samanya janteche prashn khaddyat taktil. tar kay fayda ashya media cha

saurabh , tumhi far utkrusht lihita ... asech lihine suru thewawe hi agrahachi vinanti

Apla,
Swapnil P. Bendekar

Saurabh Panchi February 15, 2010 at 4:42 AM  

स्वप्नील,
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. येत जा ब्लॊग वर.
-सौरभ