Sunday, November 29, 2009

गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा

अनेक दिवसांपासुन मला या विषयावर बोलायचं होतं...ऒरकुट वर या विषयाला तोंड फुटलं आणि काही लोकांसोबत विचारांची "प्रेमळ" देवाण घेवाण करताना ठिणगी पडली. आम्ही आमच्या राज्याविषयी बोलतोय, आमच्या स्वाभिमानाविषयी, आमच्या भाषेविषयी....आणि आपण हे सगळं बोलायला लागलो की या बाहेरच्या लोकांकडुन आलेल्या प्रतिक्रिया संतापजनक होत्या...त्यांचा तर मी आज समाचार घेणार आहेच, पण सॊफ़्ट्वेअरच्या क्षेत्रात काम करत असताना मला जे अनुभव आले ते पण सांगण्याची गरज आज मला वाटतेय.
मी इथे तेच सगळं लिहिणार आहे ज्याचा सामान्य माणसाशी थेट संबंध आहे. विषय नाजुक आहे, माझी राजकीय मतं ऐकुन तुम्ही तुम्हाला जे काही वाटतं ते सांगु शकता. कृपया वैयक्तिक प्रतिक्रिया देऊ नयेत. कारण या प्रकारांना मी भीक घालेन असं काही समजु नये.
मराठी माणुस...एवढं काही बोललं जातय या विषयावर आणि हा प्रश्न एवढा ज्वलंत आहे की मला या विषयापासुन सुरुवात करणं भाग आहे. आणि इथे मला परप्रांतियां विषयी काही बोलायचं नाहीये, मला बोलायचंय ते आपल्या विषयी. मला एकंदरीत मराठी माणसं आणि त्यांची मानसिकता या विषयी चीड आहे. मराठी माणसाने धंदा करु नये, त्याला तेवढी अक्कल नसते. नोकरी मधे मराठी माणसं फार पुढे जात नाहीत. त्यांचे वरिष्ठ साऊथ इंडियन असतात. मराठी माणसांची कंपनी नसते. व्यवसाय काय फक्त पंजाबी, सिंधी, मारवाडी, गुजराती लोकांनी करायचे? आपण काय करतोय? एखादी नोकरी, बस्स? सॊफ्ट्वेअर मधे असला तर पगार बरा मिळतो आणि चांगल्या मुलीशी लग्न होतं पण पुढे काय? एवढच ना ! पण शेवटी काय, पगार बरा असला तरिही तो नोकरच. मधे एकदा मी एक बातमी वाचली. कोणत्या तरी बॆंकेच्या सर्वोच्च पदी मराठी महिला विराजमान ! माझ्या ऒफिस मधला एक जण म्हणाला की पहिल्यांदाच मराठी माणसाला एवढं मोठं पद मिळताना बघितलं आहे. काही चुक आहे का? नाही. आपण आता एवढे निर्ढावलो आहोत की अमुक अमुक मोठा माणुस मराठी असु शकतो हे पण आपल्याला पचनी पडत नाही.
मराठी माणसं भित्री असतात, "रिस्क" घेत नाहीत असं ऐकवल जातं. का? शेअर मार्केटची वेबसाईट सगळ्यात आधी इंग्लिश, मग गुजराती आणि नंतर हिंदी मधे करण्यात आली. राज ठाकरेंनी हस्तक्षेप केला म्हणुन आता मराठी मधे वेबसाईट येणार आहे पण ही वेळ आलीच का? कारण आपला सहभाग कमी. पैसा बॆंकेमधे ठेऊन व्याज खाणारा मराठी माणुस. मी जेव्हा पहिल्यांदा शेअर्स घेतले तेव्हा माझ्या आई वडिलांना ते अजिबात आवडलं नाही. तु जुगार खेळायला लागलास हे असं काहीतरी मराठी मनोवृत्तीने त्यांनी मला सांगितलं, मी ऐकलं नाहीच कारण मी काहीही चुक करत नव्हतो. मराठी माणसं काहीच करत नाहीत असं म्हणण्याची चुक मी करणार नाही पण आज आपण सगळयांपेक्षा पुढे आहोत असं म्हणण्याची आपली हिंमत आहे का? प्रमाण काय आहे? विक्रम पंडित यांच्या सारखे काही अपवाद असतात पण हाताच्या बोटांवर मोजता येणार्य़ा लोकांकडे बघुन आपण किती दिवस खुश होणार आहोत? जेव्हा कोणी म्हणतो की मराठी माणसं फार मोठी होत नाहीत तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी किती दाखले आपल्याकडे आहेत? ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागणार आहे.
मराठी माणसं, या लोकांकडे स्वाभिमान नावाची काही चीज आहे का नाही असा प्रश्न पडतो मला. काय दिसतं, दोन मराठी माणसं एकत्र आली की हिंदी मधे संभाषण करतात. "क्या यार, कैसा है?" अरे काही लाज आहे का नाही? यांच्या तोंडात "कसा आहेस मित्रा?" हे का येत नाही? आणि मराठी बोलणं कमी पणाचं वाटतं या लोकांना. आपलीच माणसं अशी तर परप्रांतियांना दोष देऊन काय उपयोग? असे अनेक महाभाग मला माहिती आहेत ज्यांना मराठी पटकन वाचता येत नाही आणि स्वत:ला ते महाराष्ट्रीय म्हणवुन घेतात. या लोकांनी कधीही मृत्युंजय वाचलेलं नसतं पण यांना जेफ्री आर्चर माहिती असतो. अहो तुम्ही सगळ्या भाषांमधलं साहित्य वाचा, नाही कोण म्हणतंय पण आधी आपल्या भाषेत काय आहे ते तरी समजुन घ्या. सॊफ्ट्वेअर क्षेत्रात तर असे हे इंग्रजाळलेले नमुने बरेच बघायला मिळतात. माझं स्पष्ट मत आहे की या लोकांना स्वत:ला काही अक्कल नसते की काय वाचावं, उगीच बाकीचे लोक वाचतात म्हणुन हे लोक फक्त "पॊप्युलर" गोष्टी वाचतात म्हणजे यांच्या सारखे अजुन चार मराठी इंग्रज एकत्र जमले की यांना "इंप्रेशन" मारता येतं. आणि मग माझ्यासारखे लोक वेडे ठरतात. नशीब माझी कातडी गेंड्याची आहे म्हणुन यांच्या टोमण्यांचा मला कधी फरक पडत नाही. अशी मंडळी उगाचच ग्लोबलायजेशनच्या गप्पा मारतात. यांना त्यातला ग तरी कळतो का?
हा ब्लॊग लिहिण्यामागे उद्देश एकच आहे, मराठी माणसांना संघटित करणे. संघटन म्हणजे आपल्याला काही कवायती करायच्या नाहीयेत. मला काय दिसतं, एक गुजराती, मारवाडी, सिंधी माणुस मोठा बनायला लागला की तो त्याच्या आजुबाजुच्या लोकांना मदतीचा हात देतो, वर खेचतो आणि मराठी माणुस, आपले भाऊबंद वरच्या पोजिशन वर गेले की त्यांचे पाय ओढुन त्यांना खाली आणण्याचे उद्योग करतो. मला हे सगळे प्रकार कुठेतरी थांबवायचे आहेत, म्हणुन हा लिखाण प्रपंच. अगदी एक-दोन लोक जरी सुधारले तरी पुरेसे आहे. हळु हळु होईल सगळं ठीक. आता पुढचा प्रश्न की आपण हे साध्य कसे करणार आहोत? आपण नक्की काय करायला हवंय? सगळ्यात आधी आपण मराठी आहोत याचा अभिमान बाळगायला शिका. स्वत:च नाव आदराने घ्यायला शिका. फक्त चोप्रा, खन्ना, मित्तल अशी आडनावं असलेल्या लोकांना स्टाईल मारता येते का? तुमचे आडनाव कुलकर्णी, गायकवाड, पाटील काहीही असेल तर ते असं घ्यायचं जसं काही आपण या जगाचे मालक आहोत. ऎटिट्युड असलाच पाहिजे. या लहान लहान गोष्टींमधुन दिसुन येतं की आपल्याला गर्व आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला किंमत देणार नाहीत तोपर्यंत लोक तुम्हाला विचारणार नाहीत. मला हे माहिती आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या आत कुठेतरी आहेत, पण आपण वाट बघतो, कोणितरी तारणहार येईल, आणि मराठीला जुने वैभव प्राप्त करुन देईल. पण हा तारणहार दुसरा तिसरा कोणीही नसुन आपण स्वत: आहोत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधे आपण काय बघितलं, राज ठाकरेंना ७२ लाख मतं मिळाली. का? आपल्याला हे माहिती असतं की प्रत्येक राजकीय नेता हा स्वार्थासाठी सगळे उपदव्याप करत असतो आणि तरिही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवुन बघतो कारण आपल्याला आशा असते की कोणितरी आपलं भलं करेल. राज ठाकरेंना मतं मिळतात कारण ते मराठी माणसांना जे "फील" होतं ते बोलतात. असं वाटतं की हा माणुस काहितरी करेल. मुंबई मधे मराठी माणसाला मान वर करुन जगता येईल. पण आपल्याला हे स्फुल्लिंग आपल्यामधे जागवायचे आहेत, त्यासाठी कोणत्याही नेत्याची आम्हाला गरज नाही. तुम्ही मुंबईमधे राहत असाल तर तुम्हाला ते कळेलच आणि जर मुंबईच्या बाहेरचे असाल तर तिथे जाऊन राहुन बघा. मी अनुभवलं आहे, बाकीचे लोकं जेव्हा मराठी माणसांची टिंगल करतात तेव्हा काय वाटतं. असे लोकं जे पन्नास वर्षांपासुन महाराष्ट्रामधे राहतायत पण ते आजही स्वत:ला इथले मानायला तयार नाहीत. नावं घेण्यात काही अर्थ नाहीये, पण माझ्याच मित्र मैत्रिणींकडुन हे ऐकावं लागलं आहे. "दादरला महाराष्ट्रीय लोकं राहतात" हे ते वाक्य होतं. अरे! तुम्ही अनेक वर्षांपासुन इथे राहता ना! मुंबई मधे? मग असं म्हणा ना की दादरला मराठी भाषिक लोक राहतात. तुम्ही अजुनही जर स्वत:ला इथले मानणारचं नसाल तर राज ठाकरेचं काय चुकलं? इथल्या मातीशी, लोकांशी, संस्कॄतीशी तुम्ही कधीच समरस होणार नसाल तर तुम्हाला इथे कशाला राहु द्यायचं, मग जेथुन आला असाल जा तेथे परत. इथेच तर प्रश्न आहे. आता परत जाता येत नाही आणि स्वत:ला इथले मानायला तयार नाहीत. ऒरकुट वर मी या विषयावर एका ऊत्तर भारतीय "मित्रा" सोबत चर्चा करत होतो. चर्चा कसली, वादावादीच म्हणायला पाहिजे. त्याचं म्हणणं की सौरभ पंची आज अमेरिकेमधे राहतोय आणि म्हणुन त्याने हा शहाणपणा आम्हाला शिकवायची गरज नाहिये. म्हणजे जर मी ३ महिन्यांसाठी देशाबाहेर आलो तर मी बोलायचं नाही? मागची २६ वर्ष काय मी केनिया मधे होतो का रे मुर्ख माणसा? मला हेच कळत नाही, आमच्या राज्यात येऊन आमच्यावर दादागिरी करणारे हे कोण? हे तर स्वत:ला इथले मानणार नाहीत. मग यांच कशाला ऐकुन घ्यायचं? उद्या तुम्ही जा बिहार मधे नाहितर आसाम मधे, आणि असली नाटकं करा. कापुन तुकडे करुन पाठवतील तुमचे. काही नाही, मराठी माणसं सहनशील असतात म्हणुन या लोकांना माज चढला आहे. इथे राहायचं असेल तर आम्ही सांगु तसं राहा नाहितर चालु लागा हाच कायदा ठीक आहे. बरं टीका करणारा माणुस कोण? मागच्या ४-५ वर्षांमधे कधीही संभाषण ज्याने केलं नाही असा, पण मी आपल्या भाषेविषय़ी काही बोललो तर यांना लगेच केवढा राग, का रे बाबा? तु इथे पोट भरायला आलास ना? मग तु कशाला नसत्या धंद्यात पडतोस? सगळेच काही वाईट नसतात. काही लोक अगदी इथलेच होऊन जातात. असे असाल तर खुशाल या, पोट भरा आणि आनंदाने राहा. पण तुम्ही इथे येऊन इथे काय व्हायला हवय याच्या गमजा आम्हाला सांगायच्या नाहीत. या बाबतीत मला मारवाडी लोक आदर्श वाटतात. ते जिथे जातात तिथली भाषा शिकतात, संस्कृतीशी समरस होतात आणि दुधात साखर विरघळते तसे ते इथलेच होऊन जातात. या युपी बिहारच्या लोकांना हे जमत नाही. इथे राहायचं आणि इथल्याच लोकांना कमी लेखायचं. मराठी माणसांना हलकं लेखणार्य़ा प्रत्येक माणसाला हे कळालंच पाहिजे की आधीचे दिवस विसरा आता. आम्ही जागे होतोय.
हे भैय्या लोकं, टॆक्सीवाले. हे जेव्हा इथे येतात तेव्हा हे गरीब असतात. मुकाट्याने राहतात. पोटापाण्याची सोय झाली की यांना लगेच माज चढतो. कधी लोअर परेल ला संध्याकाळी टॆक्सी थांबवा आणि दादरला जायचं आहे हे सांगा. तो भैय्या असा वाईट बघेल तुमच्या कडे की तुमची तुम्हालाच लाज वाटावी. अहो तुम्ही जुहू, अंधेरी वेस्ट, माटुंगा नाहीतर साऊथ मुंबई मधे राहात असाल तरच तुम्हाला सन्मान नाहीतर ट्रेनचे धक्के. हे सगळे भाग कोणे एके काळी मराठी माणसांचे होते, आज नाहीत. का? कारण आपल्याकडे पैसा नाही. एखादा फ्लॆट घेणे आणि पुढची २० वर्ष त्याचं कर्ज फेडणे या असल्या मध्यम वर्गीय मानसिकतेमधुन बाहेर कधी पडणार आपण? "ठेविले अनंते तैसेची राहावे" ही मानसिकता सोडा आता.
हे सगळं मला इंग्लिश मधे लिहिणं अगदी सहज शक्य होतं पण ते गाढवापुढे वाचली गीता झालं असतं आणि मुख्य उद्देश या लोकांना काही समजावणे हा नसुन मराठी लोकांच एकत्रीकरण हा आहे. म्हणुन मी हे सगळं मराठी मधे लिहितोय. या लोकांचे काय वाटेल ते दावे असतात. मुंबईचा विकास परप्रांतियांमुळे झाला हा असाच एक विनोद आहे. अरे जे आधिपासुन मुंबईचे राहणारे होते त्यांच्यामुळे हे झालं. आणि हे लोक सर्व समाजाचे होते, खरे मुंबईकर. तेव्हा काही इथे युपी बिहारचे लोक नव्हते. यांच्यामधे जर एवढी क्षमता असेल तर हे लोक मुंबईवर यांची कृपादृष्टी का दाखवतात हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. तुमची राज्य सुधारा ना आधी. इथे काय तुमच्या तीर्थरुपांच श्राद्ध आहे का? हे का नाही मान्य करत की इथे रोजगार आहे म्हणुन तुम्ही इथे येता? तुमच्यामुळे विकास नाही बकालपणा येतोय आमच्याकडे. कृपा करा आता आणि महाराष्ट्राचा एवढा काही पुळका नका येऊ देऊ. विकास करुन देण्याची एवढी खाज असेल तर आसाम, अरुणाचल प्रदेश नाहीतर त्रिपुरा तिकडे जा आणि बसा विकास करत.
आणि त्यातुन आपलं सेक्युलर शासन. अरे त्या बांगलादेशी लोकांचा हे पाहुणचार करतात, मग ऊत्तरेकडचा भैय्या म्हणजे शाही पाहुणाच नाही का? कोण कोणाला बोलणार? त्या मुंबई कॊंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण असतात बघा, कामत, सिंग अशी मंडळी....अरे तुम्हाला मराठी माणसं मिळत नाहीत का? १० कोटींच्या राज्याचं नेतृत्व बाहेरच्या माणसाने का करायचं? आम्हाला नाही पटत. सचिन तेंडुलकर, आता हा माणुस क्रिकेट चांगला खेळतो म्हणुन त्याला राजकीय समजही तेवढी चांगली असेलच असं काही नाही. त्याचं काय जातंय मुंबई सगळ्यांची म्हणायला? त्याची बायको बंगाली आहे. तो काय बोलणार? बरं हे लोक नुसते येत नाहीत. या लोकांमुळे इथल्या तरूण मुलीच्या बापाला धडकी भरते. विचार करा ना, तुमची मुलगी पंजाब्या बरोबर पळुन गेली तर तुम्ही काय करणार? आणि हा रोग आपल्याकडेच जास्त पसरला आहे. मराठी मुलींना काय झालं आहे ते काही कळत नाही. प्रेम आंधळ असतं म्हणायचं आणि शांत बसायचं. होय ना? अरे मग मराठी मुलांना पंजाबी मुली का नाही मिळत? पुण्या मुंबई मधे येऊन मजा मारायची आणि शेवटी आई बाप म्हणतील त्या मुलाशी लग्न करुन मोकळं व्हायचं हा असा प्रकार आयटी मधे सर्रास चालतो हल्ली. आणि बहुतेक वेळेला मुर्ख मराठी मुलं प्रेमात आंधळी होताना दिसतात. अरे काय चाललंय हे सगळं? आता आपले निर्णय आपण घेण्याची वेळ आलेली आहे. काय चुक आणि काय बरोबर हे आपण ठरवणार आहोत. मी हे सगळं बोलतोय तर काही लोक असाही आरोप करतील की मी समाजाचं सहजीवन धोक्यात आणतोय वगैरे....मला मान्य नाही. मराठी माणसांवर अन्याय होतोय हे दिसत असताना थंड बसुन राहणं शक्य नाही. नोकरीमुळे मी मोर्चा काढु शकत नाही पण किमान जो काही हातभार लावता येईल तो लावेन.
अजुन एक उदाहरण देतो. एका हिंदी भाषिक मुलीने मला हे ऐकवलं की मराठी माणसांची हिंदी चांगली नसते, त्यातुन मराठीचा वास येतो म्हणे. आता या बाईचा प्रियकर होता साऊथ इंडियन. "तुम्हारे मा कब आता है?" हे असलं हिंदी तो बोलायचा. म्हणजे या लोकांनी असा भाषेचा बलात्क्तार केलेला चालतो पण आमच्या उच्चारांमधे आमच्या भाषेचा गंध आला की आम्ही मागास काय? हा काय प्रकार आहे? त्या मुलीला हे उत्तर मी तेव्हा देऊ शकलो नव्हतो, आज सव्याज परतफेड. अरे २६ वर्षांपासुन मी मराठी बोलतोय, मग त्याचा परिणाम होणार नाही का? तुला मराठी बोलायला शिकवलं तर तुझं हिंदी विसरुन तुला अस्खलित मराठी बाप जन्मात येणार आहे का? म्हणुन मला राज ठाकरे पटतो. कोणाला माहिती की तो जे बोलतोय ते खरंच करुन दाखवणार का? पण एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे? ६० वर्षांपासुन तेच करत आलोय आपण.
मी चीन बघितला, अमेरिका बघतोय. कोणतही बलाढ्य राष्ट्र बघा. जर्मनी, फ्रांस, जपान हे सगळे देश आपापल्या भाषेविषयी अभिमान टिकवुन आहेत म्हणुन जिवंत आहेत. भारतामधे परिस्थिती थोडी वेगळी आहे. आपल्याकडे भाषेनुसार प्रांतरचना आहे. आणि तरिही आपल्याला भारतीयत्व एकत्र बांधुन ठेवतं. आपण भारतावर तर प्रेम करतोच, पण त्याच वेळी आपण आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी देखील बांधील आहोत हे विसरुन चालणार नाही. आपण जबाबदार आहोत आपल्या भविष्य काळासाठी. आशा करतो की या सगळ्या लिखाणाचा तुम्हाला मला सगळ्यांनाच फायदा होईल. याची सुरुवात जरी झाली तरीही आपल्याला कोणीही रोखु शकणार नाही. एकी हेच आपले बळ.

जय हिंद
जय महाराष्ट्र

सौरभ पंची
३०-नोव्हेंबर-२००९

9 comments:

Kapil Deo November 29, 2009 at 11:07 PM  

Baki wadachya wishayat sadhya padayachi ichha nahi pan ek nakki ki tujh likhan khup sundar ahe ...keep writing... mafi...lihit raha!!

Kapil

aditya November 30, 2009 at 5:09 AM  

are wah..prachanda talent asach yet asta..amchya shubhechha ahet aplyala..

Anonymous November 30, 2009 at 7:38 AM  

Saurabh Good.
Khup chan vatale koni tari survat keli.
Keep it up.

Anonymous December 5, 2009 at 2:36 AM  

Hey blog nusta scrap and nonsense ahe. Jya madhe Saurabh ni techi frustration kahadli ahe.Tula itka pan nahi mahit ki ajchya date madhe saglat jasta highly educated and designated marathi peoples astat, infact I must say ki tujhi G.K khup jasta kamjor ahe.tya mule tula itki gosht nahi mahit and tu itka nonsense lihla ahe.Tu je manto ahe ki marathi mansa je marathi nahi bolun shakat te swatala maharashtrian ka mantat tar mi tujhya knowledge sathi sangun dete ki he sagla state wise pan depend karta. Tumhi agar Maharashtra madhe born and brought ahat tar tumchi marathi changli asnaras pan agar tumhi out of Maharashtra che ahat tar tumchi marathi changli naste kanki dusreya states madhe hindi preferred language aste.Anik mala asa vatata ki ek manus jo changli marathi bolto pan tyat maharshtrian cultures nahi astat tar to kuthlacha marathi infact techya hun changle tar ami aho jenla marathi chan nahi yet pan sagle customs follow karto anik mi aj pan proud ni mante ki “Mi Maharashtrian ahe”..Ek anik gosht mi tula lakshat dilun dete ki apan adhi Indians aho ani tya nantar maharashrian.Tu India madhe rahun,discreton karto ahe tar kay difference tujhya madhe anik tya lokan madhe je castism la support kartat.

सौरभ पंची December 15, 2009 at 11:02 AM  

Dear Anonymous (Marathi changli nasaleli),
mi ithe GK war lihila nahiye, 1-2 Marathi lok mothi zali mhanun haa kahi trend zalela nahiye...mala saamanya marathi manasala war aanayach ahe, motha banawayacha ahe, he tu aadhi lakshat ghe. kashasathi lihila ahe te aadhi samjun ghe, ugach teeka karaychi mhanun karu nako. Ani tu swatahala Maharashtrian maantes hi khup changli goshta ahe, tya baddal tujhe Abhinandan. Raahila prashna tuzya bhaashecha, tar ithe kahi warsha raha, tee sudharun jaail. Vidarbha side chi ahes watata (mi tula lakshat dilun dete :P )
Ani castism ha wishay wegala ahe,aapan aadhi Indians aahot he maanya ahe mhanun kahi ithe saglyana mokala raan dilela nahiye. mala watata ki tu aadhi ithlya lokana samjun ghe, tyashiway tula he prashna kalnar nahit

साधक December 19, 2009 at 1:04 PM  

फारच व्यवस्थित व अप्रतिम लिहिलं आहेस. अनामिकेचा वयक्तिक हल्ला विसर. ती स्वत:ला महाराष्ट्रियन म्हणवते ते ही नसे थोडके. आम्ही sagle customs follow karto असं जेव्हा ती म्हणते तेव्हा भाषा हा संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे हे ती विसरलेली दिसते. अमृतमंथन, महेंद्र यांचे या विषयावरचे ब्लॉग्स खूप छान आहेत. तुझा ब्लॉग मराठी ब्लॉगविश्वाला जोड आणखी वाचक मिळतील.http://marathiblogs.net/
http://amrutmanthan.wordpress.com/
http://kayvatelte.wordpress.com/2009/12/17/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80/

Vrushali December 23, 2009 at 12:24 PM  

hey didnt know u write as well...other blogs are nice but this one..well i dont really agree with it...but i appretiate your views and u write well

ramchandra December 29, 2009 at 3:31 AM  

Khupach Chhan, Pratyek Marathi Manasala tyache Marathipan Jagrut Karayala lavanara tumcha leth
Aahe.....

Vijay Manohar Deshmukh January 5, 2010 at 9:10 PM  

सौरभ, छान लिहितोस तु... लिहित रहा... अनमिक लोकांना उत्तर देण्याची गरज नाही कारण त्यांच्यात चर्चा करण्याचीसुद्धा हिंमत नसते. त्यामुळे तिकडे लक्ष न देता ... लिहित रहा... शुभेच्छा...