Saturday, November 21, 2009

सुरुवात...

नमस्कार मित्रांनो,

मी सौरभ पंची आपल्या भेटीला येतोय, एका नव्या माध्यमातुन...

आता तुम्ही म्हणाल अजुन एक कोणीतरी ब्लॊग लिहायला लागला, हल्ली काय कोणीही ब्लॊग्स लिहितो...
त्याचं काय झालं की हल्लीच ऒरकुट वर एक गरमा गरम चर्चासत्र सुरु असताना एकाने मला असा "प्रेमळ" सल्ला की ऒरकुट ही वैयक्तिक मतं प्रदर्शित करण्याची जागा नव्हे, मला पटलं ते. ठीक आहे, ऒरकुट नाही ना, तेव्हा वाटलं की आपण एक ब्लॊग लिहावा. आधी असं वाटायचं की फ़क्त मोठे माणसं ब्लॊग लिहित असावेत, अमिताभ, आमीर यांच्यासारखे पण आता जमाना बदलतो आहे. आपल्याला जे पटतं ते लिहिण्यासाठी ब्लॊग वापरायला काही हरकत नाही.

आता पुढचा प्रश्न म्हणजे मी काय लिहिणार? विनोदी असं काही, प्रवास वर्णन, शेअर मार्केट, क्रिकेट, सॊफ़्ट्वेअर, फोटोस, "राज"कारण जे वाटेल ते लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तर म्हणतोय हिमेश रेशमिया वर पण लिहावं....बरं बरं ठीक आहे, भावना पोचल्या, नाहीतर मार खावा लागेल. तर मी सगळं काही सामान्य माणसांसाठी लिहिणार आहे. पुण्यात घर कसं शोधावं, सगळ्यात मस्त साबुदाणा वडे कुठे मिळतात, पुण्यातल्या मुलींपैकी सुंदर मुलींचे प्रमाण काय, अरेंज का लव्ह, कोणते लग्न जास्त फ़ायदेशीर असे सगळे छोटे छोटे डिटेल्स मी शेअर करेन. सब कुछ आम आदमी के लिये, मॆंगो पीपल :)

मी ब्लॊग लिहिणार आहे हे कळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आदित्य ने दिली. तो म्हणे अरे तु काय लिहिणार, असं काही लिहिण्यासाठी प्रचंड टॆलेंट लागतं, पण सगळं काही व्हाईट कॊलर लोकांसाठी असेल तर आम्हाला सामान्य लोकांना काय वाटतं हे कोण सांगणार ? म्हणुन आज मी सुरुवात करणार आहे.

मग काय, करुया सुरुवात ! आजचा दिवस पण छान आहे, कारण आज माझा वाढदिवस आहे :)

चला मग, श्री गणेशा करु या.

2 comments:

Anonymous November 29, 2009 at 10:23 PM  

Panchi Saheb ,Ekdum Zhakkkas .
Tumhala ek wachak nakki sapadlay.
Best of Luck!
Milind Ture

Anonymous December 31, 2009 at 9:00 AM  

Saurabh...mahit navhta tujha he talent :) keep going buddy!

Sumant